News Flash

आमिरने वाचवले ‘दंगल’च्या इंजीनिअरचे प्राण; सोशल मीडियावर कौतुक

कधी- कधी ऑनस्क्रीन हिरो असं काही काम करून जातात की ते खऱ्या आयुष्यातही हिरो ठरतात.

आमिर खान

कधी- कधी ऑनस्क्रीन हिरो असं काही काम करून जातात की ते खऱ्या आयुष्यातही ते हिरो ठरतात. मध्यरात्री एका सहकाऱ्याच्या मदतीला धावून त्याचे प्राण वाचवणाऱ्या अभिनेता आमिर खानवर सध्या सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तंत्रज्ञ शजिथ कोयरी यांच्यासाठी बॉलिवूडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान रिअल लाइफ हिरो ठरला आहे.

‘दंगल’ चित्रपटासाठी साऊंड इंजीनिअर म्हणून काम केलेल्या शजिथ कोयरी यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोयरी यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी बरीच वेळ वाट पाहिली. पण कोणतेच डॉक्टर तिथं न आल्याने अखेर आमिर खानकडून मदत करण्यासाठी कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधला.

आमिरला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तातडीने तो रुग्णालयात पोहोचला. लीलावतीमधून कोयरी यांना कोकिलाबेन रुग्णालयात हलवलं आणि तिथेच पुढील उपचार करण्यात आले. आमिरच्या या मदतीमुळे कोयरी यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून आमिरची प्रशंसा होऊ लागली. मध्यरात्री एका सहकाऱ्याच्या मदतीला धावणाऱ्या आमिरचं सर्वांनीच कौतुक केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 9:12 am

Web Title: aamir khan heroic act helped save life of his dangal technician fans shower love
Next Stories
1 निर्मिती क्षेत्रानंतर आता फूड शोमध्ये चित्रांगदा सिंहचं पाऊल
2 आलिया व माधुरी दीक्षित यांच्यात ‘कलंक’मध्ये रंगणार जुगलबंदी
3 ‘तारक मेहता..’मध्ये लवकरच परतणार दयाबेन
Just Now!
X