News Flash

सलमानला ‘दंगल’ चित्रपट दाखवण्यासाठी आमिर उत्सुक

महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेतील आमिर त्याच्या मुलींना कुस्तीमधील डावपेच शिकवण्यात यशस्वी होणार का?

आमिर खान, सलमान खान

अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. गेल्या बऱ्याच काळापासून आमिरच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपट म्हटले की त्याची प्रसिद्धी आलीच. पण, आमिर त्याच्या ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी एका वेगळ्याच मार्गाचा अवलंब करताना दिसतोय. अभिनेता आमिर खान आणि सलमान खान यांची मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. पण, यावेळी मात्र आमिर कोणत्याही टेलिव्हीजन कार्यक्रमामध्ये त्याच्या चित्रपटाची प्रसिद्धी करणार नाहीये. पण, परफेक्शनिस्ट आमिरला विश्वास आहे की त्याचा चांगला मित्र सलमान खान त्याच्या चित्रपटाच्या प्रसिद्धीतही हातभार लावेल.

वाचा: आमिरच्या पत्नीचे एक कोटींचे दागिने चोरीला!

‘मला विश्वास आहे की, सलमान माझ्या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये हातभार लावेल. मलाही त्याच्या चित्रपटांचे प्रमोशन करायला आवडते. त्यामुळे सलमानला ‘दंगल’ हा चित्रपट दाखविण्यासाठी मी फार उत्सुक आहे’, असे आमिर प्रसारमाध्यमांसमोर म्हणाला. दरम्यान अभिनेता सलमान खान सध्या ‘बिग बॉस १०’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. विविध चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी कलाकार ‘बिग बॉस’च्या मंचावर हजेरी लावतात. त्यामुळे चाहत्यांना अशी आशा होती की, परफेक्शनिस्ट आमिर खान आणि सलमानचा याराना पाहता ‘दंगल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर ‘बिग बॉस’ची वाट धरणार. पण, याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत प्रसारमाध्यमांशी बोलताना आमिरने नुकतेच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या टेलिव्हीजन शो मध्ये ‘दंगल’ची प्रसिद्धी केली जाणार नाही. ‘मी या चित्रपटाचे प्रमोशन कोणत्याही  टेलिव्हीजन शोमध्ये करणार नाही. पण, जाहिरात आणि चित्रपटाचे काही प्रोमो टेलिव्हीजनवर दाखवण्यात येतील. पण, मी कोणत्याही कार्यक्रमामध्ये जाणार नाही’, असे आमिर म्हणाला.

वाचा: VIDEO: ‘दंगल’साठी आमिरचा ‘फॅट टू फिट’ प्रवास

दरम्यान आमिरच्या या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. या चित्रपटामध्ये आभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री साक्षी तन्वर झळकणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारण्यासाठी आणि वयाच्या विविध टप्प्यातील त्यांचे रुप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूपच मेहेनत घेतल्याचे दिसतेय. नुकतेच आमिरने प्रसारमाध्यमांसाठी ‘दंगल’ चित्रपटाच्या ‘बिहाइंड द सीन्स’ची स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आली होती. या चित्रपटाकडून फक्त आमिरलाच नव्हे तर प्रेक्षकांनाही फार अपेक्षा आहेत. यावेळी आमिरने त्याच्या व्यायामाविषयी आणि आहाराविषयीही चर्चा केली. एका महत्त्वाकांक्षी वडिलांच्या भूमिकेतील आमिर त्याच्या मुलींना कुस्तीमधील डावपेच शिकवण्यात यशस्वी होणार का? हे जाणून घेण्यासाठी सध्या अनेकांचेच लक्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेकडे लागून राहिले आहे. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती तसेच नितेश तिवारी दिग्दर्शित दंगल हा चित्रपट येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 12:45 pm

Web Title: aamir khan is dying to show dangal to his close friend salman khan
Next Stories
1 आमिरच्या पत्नीचे एक कोटींचे दागिने चोरीला!
2 BLOG : सई ताम्हणकर सोलो ट्रॅव्हलर…
3 Yuvraj and Hazel Keech Wedding: ..या दोघांच्या खांद्यावर असेल युवी-हेजलच्या लग्नाची धुरा
Just Now!
X