अभिनेता आमिर खानने वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावरुन चाहत्यांचा निरोप घेतला आहे. सोशल मीडियाला पाठ फिरवण्यामागचं कारण आमिरने सांगितलं नाही म्हणून त्याचे चाहते दुखावले गेले आहेत. मात्र, आमिर त्याचा मित्र अमीन आजीचा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी अनेक फोटोग्राफर्सने आमिरला याविषयी प्रश्न विचारले असताना शेवटी आमिरने उत्तर दिले आहे. आमिरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. आमिरला एक फोटोग्राफर प्रश्न विचारतो की सोशल मीडियाचा निरोप घेण्यामागचं कारण काय आहे? “त्या मागे असं काही मोठ कारण नाही आहे. तुम्ही तुमचं मत मांडू नका, मी निरोप वगैरे घेतलेला नाही मी इथेच आहे. मी कुठे जाणार नाही,” असे आमिर म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आमिर पुढे म्हणाला की, “आपण या आधी ही एकमेकांच्या संपर्कात होतो…आणि आता तर मीडियाचा रोल खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण मी मीडियाच्या माध्यमातूनचे सगळ्या लोकांशी बोलू शकणार आहे. मी सोशल मीडियावर असा ही सक्रिय नव्हतो म्हणून मी बंद करण्याचा निर्णय घेतला.”

आमिर लवकरच ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच करीना कपूर देखील या चित्रपटात पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे.