अनेकांना प्रेरणा देणारा आणि तरुणांचे स्फूर्तीस्थान असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खान आता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरला ‘हिरोपंती’ चित्रपटाद्वारे लॉन्च करण्यासाठी सिध्द झाला आहे. ‘हिरोपंती’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकच्या प्रदर्शन कार्यक्रमात आमिर खान टायगर श्रॉफला माध्यमांसमोर आणणार आहे. २३ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी आमिर सज्ज झाला असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘धूम-३’या शेवटच्या चित्रपटात जॅकी श्रॉफबरोबर दिसलेल्या आमिर खानचे जॅकीबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत. टायगर लहान असल्यापासून आमिर खान त्याला ओळखतो. दोघांना व्यामाची आवड असून, जिममध्ये व्यायाम करताना दोघे एकमेकांचे पार्टन होते.