‘टी सीरिज’चे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आमिर खान याची निर्मिती करत आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स आणि टी सीरिज मिळून हा बायोपिक पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याविषयी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे काही कारणास्तव अक्षय कुमारने या चित्रपटात भूमिका साकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे टी- सीरिजचे भूषण कुमार आणि अक्षय यांच्यात कटूता निर्माण झाली होती. अक्षयच्या या निर्णयाने नाराज झालेल्या भूषण कुमार यांनी दुसरा एखादा सुपरस्टार निवडेन असं ठरवलं आणि बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खानकडे विचारणा केली. आमिरनेही या चित्रपटासाठी होकार दिला.
या बायोपिकचं नाव ‘मोगुल’ असं ठेवण्यात आलं असून सुभाष कपूर त्याचं दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. काही महिन्यांपूर्वी अक्षयने या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकसुद्धा सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र, काही मतभेदांमुळे ऐनवेळी चित्रपटातून काढता पाय घेत अक्षयने निर्मात्यांकडून घेतलेली काही रक्कमसुद्धा परत केली.
#WeWantSacredGames2 : ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनसाठी नेटकरी आतूर
सध्या आमिर खान ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर गुलशन कुमार यांच्या बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात होईल. यामध्ये कोणकोणते कलाकार असतील हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 6:03 pm