21 January 2019

News Flash

PHOTOS : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा..

१५ वर्षांपूर्वी आमिर आणि रीनाने संगनमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

आमिर खान, रीना दत्ता, किरण राव

एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे नवऱ्याची पहिली पत्नी त्याच्या दुसऱ्या बायकोची कधीच चांगली मैत्रीण होऊ शकत नाही हे आजवर आपण पाहत आलो आहोत. मात्र, बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हा यालासुद्धा अपवाद ठरल्याचे दिसते. चित्रपटांमध्ये दिसणारे त्याचे परफेक्शन त्याच्या जीवनातही दिसून येते. आमिरने त्याची पूर्वपत्नी रीना दत्ता आणि आताची त्याची पत्नी किरण राव या दोघींसोबतच्या नात्यामध्ये त्याने समतोल राखला आहे. त्यामुळेच रीना आणि किरण यांच्यात चांगली मैत्री असल्याचे दिसून येते.

वाचा : बॉलिवूड पदार्पणापूर्वीच कतरिनाच्या बहिणीचे नखरे!

पाणी फाऊंडेशनच्या वतीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत किरण राव आणि रीना दत्ता एकत्र आल्या होत्या. यावेळी या दोघी एखाद्या मैत्रिणींसारख्या एकमेकांसोबत गप्पा मारत होत्या. आमिरदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. आमिरची पूर्व पत्नी रीना आणि सध्याची पत्नी किरण यांच्यातील मैत्री हे या पत्रकार परिषदेचे विशेष आकर्षण ठरले. रीना आणि किरणने एखत्र कॅमेऱ्यांना पोजदेखील दिली. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी आणि रतन टाटासुद्धा उपस्थित होते.

वाचा : आणखी एका अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा?

आमिर खान आणि रिना दत्ता यांचे १८ एप्रिल १९८६ रोजी लग्न झाले होते. पण, १५ वर्षांपूर्वी या जोडप्याने संगनमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही आमिर आणि रीनामध्ये चांगली मैत्री आहे. गेल्याव वर्षी रीनाच्या बर्थडे पार्टीलाही आमिर गेला होता. त्यांना इरा आणि जुनैद ही दोन मुलं असून, त्यांचा सांभाळ रीनाच करते. रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर २८ डिसेंबर २००५ ला आमिरने किरण रावशी लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला आझाद हा मुलगा आहे.

First Published on January 13, 2018 1:12 pm

Web Title: aamir khans wife kiran rao and ex wife reena dutta bond at an event