News Flash

Video: आजीला सोडताना भावूक झाली आराध्या

व्हिडिओमध्ये आजी लांब जाताना दिसते तेव्हा आराध्या तिला हाक मारून बोलावून घेते

आराध्या बच्चन ही सोशल मीडियाची आवडती स्टार आहे. इंटरनेटवर तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सातत्याने व्हायरल होत असतात. मंगळवारी रात्री ऐश्वर्या मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय यांच्यासोबत जेवायला गेली होती. हॉटेलमधून बाहेर निघताना तिघंही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले.

हॉटेलमधून बाहेर पडताना जेव्हा वृंदा राय त्यांच्या गाडीत बसायला निघाल्या तेव्हा आराध्या फार भावूक झाली. ती धावत आजीकडे गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. आजी आणि नातीच्या या खास बॉण्डिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये आजी लांब जाताना दिसते तेव्हा आराध्या तिला हाक मारून बोलावून घेते. यानंतर दोघीही एकमेकींना घट्ट मिठी मारतात. नातीला मिठी मारल्यानंतर ती मुलीला मिठी मारायला विसरत नाही. व्हिडिओमध्ये आजीचं नातीवर असणारं प्रेम लख्ख दिसतं. आराध्याला आजीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता. म्हणूनच आजी दूर जातेय कळल्यावर ती आजीला थांबवायला पळली.

ऐश्वर्याने नुकताच तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आपल्या शाळेतील मित्र- मैत्रिणींसोबत बसलेली दिसत आहे. ऐश्वर्याचा लहापणीचा फोटो पाहिल्यावर आराध्या हुबेहुब तिच्याचसारखी दिसते याचा पुन्हा एकदा प्रत्यय येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 6:54 pm

Web Title: aaradhya upset while parting aways with grand mother dinner date aishwarya rai video viral
Next Stories
1 इंधन दरवाढीवर आता गप्प का ? अमिताभ, अक्षय कुमार, सलमानवर नेटकऱ्यांचा भडका
2 ‘या’ ठिकाणी हनिमूनला गेली सोनम कपूर?
3 अभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न?
Just Now!
X