अभिनेत्री सायली संजीव हिची मुख्य भूमिका असलेला ‘आटपाडी नाईट्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरवरुन या चित्रपटामध्ये कॉमेडीचा मोठ्या प्रमाणावर भरणा करण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये वसंत बापूसाहेब खाटमोडे (अभिनेता प्रणव रावराणे) हा युवक आपल्या मित्रांसोबत भविष्य जाणून घेण्यासाठी एका ज्योतिषाला हात दाखवतोय, त्यावर तो ज्योतिष वसंताचा विवाह येत्या २० दिवसात होण्याचा बेत असल्याचे सांगतो. मात्र लग्न झालं तरी तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ हे वाक्य ज्योतिष आवर्जुन सांगतो. विशेष म्हणजे हेच वाक्य चित्रपटाची उत्कंठा वाढवतो. त्यातच चित्रपटामध्ये अभिनेत्री सायली संजीवची एण्ट्री होते.

Sharad Pnkshe reaction on Article 370
यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाबद्दल शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “काँग्रेसने काय वाटोळं…”
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”


दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन नितिन सिंधु विजय सुपेकर यांनी केले असून चित्रपटाची कथादेखील त्यांनीच लिहीली आहे. तर चित्रपटाची प्रस्तुती सुबोध भावे आणि मायदेश मीडिया करत आहेत. हा चित्रपट येत्या २७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.