अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेल्या ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटातील ‘आवाज वाढव डीजे’ हे गाणं तुफान गाजलं. लग्नाच्या वरातींपासून ते अगदी पार्टीजपर्यंत सगळीकडे या गाण्याने धूम उडवून दिली. हे गाणं क्षितिज पटवर्धनने शब्दबद्ध केलंय. या गाण्याच्या ओळी कशा सुचल्या याविषयी त्याने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

पाहा व्हिडीओ-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाटककार, चित्रपट पटकथा-संवाद लेखक, गीतकार, जाहिरातींसाठी कॉपी रायटर, दिग्दर्शक, विविध पुरस्कार सोहळ्यांसाठी संहिता लेखन अशा विविध भूमिकांमधून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारा चेहरा म्हणून क्षितिज पटवर्धन याची ओळख आहे. मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीत क्षितिजने अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. तरुणाईची नेमकी नस त्याने पकडली असल्याने आणि तो स्वत:ही तरुण असल्याने त्याचे लेखन हे तरुणाईला आवडते व ते ताजे-टवटवीतही वाटते.