मराठी सिनेमाच्या इतिहासात प्रथमच एका बॉलीवूड सिनेमाची टीम मराठी सिनेमावर काम करत आहे. फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आता आपल्या पहिल्या ‘हृदयांतर’ ह्या मराठी सिनेमाद्वारे निर्माता-दिग्दर्शक झाला आहे. मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका असलेल्या ह्या सिनेमाचा नुकताच डिसेंबरमध्ये थाटात मुहूर्त समारंभ झाला.

विक्रम फडणीस प्रॉडक्शन्स, आणि यंग बेरी प्रॉडक्शन्स (प्रताप सरनाईक आणि पुर्वेश सरनाईक) ह्यांची निर्मिती असलेला ह्या सिनेमात पहिल्यांदाच एक हिंदी सिनेमाचा संपूर्ण क्रु काम करत आहे. अब्बास-मस्तान ह्या चित्रपट निर्माता-दिग्दर्शक जोडीसोबत १० पेक्षा जास्त चित्रपट विक्रम फडणीसने केले आहेत. अब्बास-मस्तान ह्यांच्या सिनेमासाठी आत्तापर्यंत अनेकदा कॉस्च्युम डिझाइन केल्यावर आता आपली मैत्री विक्रम अजून नव्या स्तरावर घेऊन जात आहे. निर्माता-दिग्दर्शकाच्या ह्या यशस्वी जोडीच्या प्रॉडक्शनचा संपूर्ण क्रु आता विक्रम फडणीसच्या सिनेमासाठी काम करतोय. डीओपी (डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी) सह सहाय्यकांचा आणि तंत्रज्ञांचा ह्यात समावेश आहे.

vikram-film-crew-4

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “अब्बास-मस्तान ह्य़ांच्यासोबत विक्रम फडणीसचा खूप जुना ऋणानुबंध आहे. त्यांच्यासोबत विक्रम फडणीसने ब-याच अवधीपासून काम केले आहे. ह्या फिल्ममेकर जोडीने हृदयांतर सिनेमाच्या मुहूर्ताच्या समारंभालाही आवर्जुन उपस्थिती लावली होती. आणि विक्रमला शुभेच्छा दिल्या होत्या.”

हिंदी चित्रपटांबरोबरच फॅशन डिझायनर म्हणून स्वत:च्या कलेक्शनने एक वेगळी ओळख निर्माण करणारा विक्रम ‘हृदयांतर’च्या निमित्ताने निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन भूमिकांमधून समोर येणार आहे. ‘कान्हा’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीचा श्रीगणेशा करणाऱ्या ‘यंग बेरी एंटरटेन्मेंट’ने ‘हृदयांतर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गेली अनेक वर्षे एक उत्तम चित्रपट बनवण्याचे स्वप्न विक्रम फडणीस यानs उराशी बाळगले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने ते स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले गेले असल्याने त्यानs आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटाला मुहूर्ताचा क्लॅप बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खान याने दिला होता. तर अर्जुन कपूरनेही आपल्या मित्राच्या या नव्या कामासाठी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.