News Flash

अभिज्ञा भावे पुन्हा प्रेमात; ‘त्या’ खास व्यक्तीसोबत शेअर केला फोटो

या फोटोवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.

अभिज्ञा भावे

‘तुला पाहते रे’ आणि ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला असून याच फोटोमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. अभिज्ञानं मेहूल पै सोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने प्रेमाची कबुली दिली आहे.

‘नेहमीच कृतज्ञ राहीन’, असं कॅप्शन देत अभिज्ञाने #myforever असा हॅशटॅग दिला. गेल्या काही महिन्यांपासून अभिज्ञा व मेहूल एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता अभिज्ञाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्याला दुजोरा दिला आहे. या फोटोवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत बाळ शंभूराजे साकारणाऱ्या दिवेशला दहावीत मिळाले इतके टक्के 

२०१४ मध्ये अभिज्ञाचं वरुण वैटिकरसोबत लग्न झालं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञाला ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने सर्वप्रथम ओळख मिळवून दिली. पहिल्याच मालिकेत तिनं नकारात्मक भूमिका साकारली होती. त्यानंतर सुबोध भावे व गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘तुला पाहते रे’ मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. मालिकांसोबत तिने चित्रपट व वेब सीरिजमध्येही काम केलंय. मात्र अभिनयाकडे वळण्यापूर्वी ती एअर होस्टेस म्हणून काम करत होती. अभिज्ञा व तेजस्विनी पंडित यांचा ‘तेजाज्ञा’ हा फॅशन ब्रँडसुद्धा फार प्रसिद्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:54 pm

Web Title: abhidnya bhave is in love again shared photo with a special person ssv 92
Next Stories
1 “माझ्या गावासाठी हा ऐतिहासिक क्षण”; Rafale आगमनानंतर अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
2 ‘आत्महत्येमुळे ज्यांनी त्रास दिला, त्यांना वेदना होतील असे तरुणाईला वाटते का?’ हेमंत ढोमेचा सवाल
3 मनोज वाजपेयी साकारणार कुख्यात गुंड विकास दुबे? तो म्हणतो…
Just Now!
X