14 August 2020

News Flash

आराध्या बच्चनचाही करोना रिपोर्ट आला समोर

ऐश्वर्या राय बच्चन व जया बच्चन यांच्यासोबतच आराध्याचीही करोना चाचणी झाली.

ऐश्वर्या राय बच्चन व जया बच्चन यांच्यासोबतच आराध्याचीही करोना चाचणी झाली. तिचाही करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शनिवारी रात्री बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचीही करोना चाचणी झाली. त्यांच्या पाठोपाठ अभिषेक बच्चनचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अभिषेकनेही ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली.

सध्या अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांनाही करोनाची सौम्य लक्षणं आहेत. बिग बींच्या जलसा आणि जनक बंगल्यातील कर्मचाऱ्यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. तसंच गेल्या दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केलं आहे.

काय म्हटलं आहे अमिताभ बच्चन यांनी?

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी रुग्णालयात दाखल झालो आहे. काही चाचण्या आणखीही केल्या जाणार आहेत. मागील दहा दिवसात जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनीही चाचणी करावी असं आवाहन मी करतो आहे. या आशयाचं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

राजेश टोपे यांनी काय म्हटलं आहे?

अमिताभ बच्चन यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. मात्र त्यांना करोनाची लक्षणं नाहीत.  त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 7:39 am

Web Title: abhishek and aishwarya rai bachchan daughter aaradhya reports of covid 19 ssv 92
Next Stories
1 महाराष्ट्राची रंगतदार निवडणूक वेबमालिकेत
2 ‘अभिनय ही समर्पित सेवा’
3 करोनोत्तर मराठीपट
Just Now!
X