24 September 2020

News Flash

अभिषेक आणि श्वेताने सांगितले बच्चन कुटुंबीयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमधील सिक्रेट

त्यांनी एका शोमध्ये हा खुलासा केला आहे.

सध्याच्या स्मार्टफोनच्या जगात प्रत्येक व्यक्तीचा आपल्या कुटुंबीयांसोबत व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप असणं हे कॉमन झाले आहे. पण बच्चन कुटुंबीय त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये काय बोलत असतील? त्यांच्या कुटुंबामध्ये कोण सर्वात जास्त बोलत असेल? कोण सर्वात जास्त विनोद करत असेल? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा यांनी हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमधील काही सिक्रेट सांगितले.

सर्वात कमी कोण अ‍ॅकटीव्ह असतं?
अमिताभ बच्चन हे ट्विटरवर प्रचंड सक्रिय असतात. पण ते व्हॉट्सअ‍ॅप फार कमी प्रमाणावर वापरतात. कधीकधी त्यांना SMS (एसएमएस) पाठून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाहण्यासाठी सांगावे लागते असे अभिषेक म्हणाला. तसेच ऐश्वर्या देखील फार कमी अ‍ॅक्टिव्ह असल्याचे अभिषेकने सांगितले. ती फोन आणि मेसेजेसला उत्तर देण्यासाठी प्रचंड वेळ लावते असे देखील त्याने म्हटले.

भावनिक मेसेज कोण पाठवतं?
प्रत्येक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये एक व्यक्ती तरी अशी असते जी सतत भावनिक मेसेज पाठवते. तसचं बच्चन कुटुंबीयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमध्ये जया बच्चन या असे मेसेज पाठवत असल्याचे अभिषेकने सांगितले आहे.

सर्वात कूल मेंबर कोण?
श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य ग्रूपमधला सर्वात कूल मेंबर असल्याचे अभिषेकने म्हटले. तो सतत त्याची आई श्वेतासोबत मस्ती करत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 3:31 pm

Web Title: abhishek bachchan and shweta nanda talks about bachchan family whatsapp group avb 95
Next Stories
1 शूटिंगच्या सेटवर अभिनेता बेशुद्ध; उपचाराआधीच झाला मृत्यू
2 साथ निभाना साथिया २ : ‘ही’ अभिनेत्री साकारणार कोकिलाबेनची भूमिका
3 “..तर लोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल”; पंकज त्रिपाठींनी घराणेशाहीबद्दल मांडलं वेगळं मत
Just Now!
X