News Flash

फिल्म हिट होण्यासाठी अभिषेकने केला नावात बदल?

'द बिग बुल'च्या ट्रेलरमध्ये अभिषेकने नावात बदल केल्याचे पाहायला मिळाले

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप ठरले. बऱ्याच वेळा त्याचे चित्रपट फ्लॉप होत असल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. पण अभिषेकने याकडे दुर्लक्ष केले. पण आता अभिषेकने त्याच्या नावात बदल केला असल्याचे समोर आले आहे. त्याने हे पाऊल त्याचा आगामी चित्रपट हिट होण्यासाठी उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

अभिषेकने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये असे पहिल्यांदा केले आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहता त्यामध्ये अभिषेकने त्याच्या नावात आणखी एक ‘A’ जोडला आहे. त्यामुळे Abhishek Bachchanच्या ऐवजी Abhishek A Bachchan असे दिसत आहे. अभिषेकने त्याच्या नावात वडिल अमिताभ बच्चन यांच्या नावाचे पहिले अक्षर ‘A’ लिहिण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पूर्वी अभिषेक Abhishek Bachchan असे नाव लिहित होता.

अभिषेकने ‘लुडो’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याचे नाव Abhishek A Bachchan असे लिहिले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नावात बदल केल्यामुळे अभिषेकला करिअमध्ये फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. आता अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

आणखी वाचा : पुन्हा ‘scam’, अभिषेकच्या ‘The Big Bull’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

येत्या ८ एप्रिलला अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. करोना महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट ८ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:58 pm

Web Title: abhishek bachchan changed his name avb 95
Next Stories
1 Birthday Special : अल्का याज्ञिकने आमिरला काढले होते खोलीबाहेर
2 ‘अक्षयकडे आता २-३ वर्ष शिल्लक’, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत
3 लग्नानंतर २७ वर्षे पतीपासून लांब राहत होत्या अल्का याज्ञिक, जाणून घ्या कारण
Just Now!
X