बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप. त्याच्या काही भूमिका विशेष गाजल्या होत्या. तरी देखील त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बऱ्याच वेळा अभिषेकला महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्यामुळे ट्रोल केले जाते. एक वेळ तर अशी होती की अभिषेकने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्याला सल्ला दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका मुलाखतीमध्ये अभिषेकने याबाबत खुलासा केला होता. ‘एक वेळ अशी होती की मला सारखे वाटायचे ही इंडस्ट्री माझ्यासाठी बनलेली नाही. पब्लिक प्लॅटफॉर्मवर अयशस्वी होणे हे खूप कठीण असते. तेव्हा मी सोशल मीडियावर नव्हतो. पण मीडियाद्वारे मला कळायचे की काही लोकं माझ्या अभिनयावर टीका करातात, अपशब्द वापरतात आणि मला अभिनय जमत नाही असे त्यांना वाटायचे’ असे अभिषेक म्हणाला.

Video: नेहा कक्करने असे काय केले की अनू मलिकने स्वत:च्याच कानशिलात लगावली

पुढे तो म्हणाला, ‘तेव्हा मला जाणवू लागले की मी चुकीचे प्रोफेशन निवडले आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी मी इथे काम करु शकत नाही. तेव्हा मी माझ्या वडिलांकडे गेलो आणि त्यांना बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले की मी तुला सोडून जाणारा व्यक्ती होण्यासाठी लहानाचे मोठे केलेले नाही. एक अभिनेता म्हणून तू प्रत्येक चित्रपटात काम करत स्वत:ला सिद्ध करुन दाखवत आहेस.’ अमिताभ यांनी सल्ला दिल्यानंतर अभिषेकने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय बदलला.

आणखी वाचा : ‘थर्ड क्लास अभिनय…’, द बिग बुल प्रदर्शित होताच अभिषेक बच्चन झाला ट्रोल

काही दिवसांपूर्वीच अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan recalls father amitabh bachchans words while quitting bollywood industry avb
First published on: 12-04-2021 at 11:36 IST