मराठी कलाविश्वात सध्या लगीनगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘कन्यादान’ फेम लोकप्रिय जोडी अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

थाटामाटात लग्न झाल्यावर अमृताचा सासरी मोठ्या आनंदाने गृहप्रवेश करण्यात आला. तिच्या सासऱ्यांनी लाडक्या सुनबाईंसाठी सगळी तयारी करून ठेवली होती. शुभंकर हा दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा आहे. सध्या अभिनेता त्याच्या वडिलांबरोबर पुण्यात राहतो, तर अमृता ही मूळची मुंबईची आहे.

हेही वाचा : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ फेम साईराजची ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, येणार ७ वर्षांचा लीप

अमृता-शुभंकरचा विवाहसोहळा पुणेरी थाटात पार पडला होता. अभिनेत्रीच्या सासऱ्यांनी नव्या सुनेचं घरी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. अमृताच्या सासरेबुवांनी लग्नाच्या पहिल्या रात्री खास या जोडप्याची बेडरुम सजवली होती. अभिनेत्रीने या व्हिडीओला “सासरे खास रे…” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच तुमच्या सासऱ्यांनी तुमच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीची सजावट केलीये का? असा प्रश्न देखील अमृताने तिच्या चाहत्यांना विचारला आहे.

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता अडकणार विवाहबंधनात, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई

दरम्यान, अमृता आणि शुभंकरची पहिली भेट ही ‘कन्यादान’ या मालिकेच्या सेटवरच झाली होती. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.