News Flash

…म्हणून मी अद्यापही करोना पॉझिटिव्ह, अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली माहिती

अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

संग्रहित

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करत ही माहिती दिली आहे. मात्र अभिषेक बच्चनला डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. अभिषेक बच्चनने आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून रुग्णालयातच उपचारासाठी थांबावं लागणार असल्याचं सांगितलं आहे.

अभिषेक बच्चनने ट्विटमध्ये सांगितलं आहे की, “दुर्दैवाने इतर व्याधींमुळे माझा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला असून रुग्णालयातच थांबावं लागणार आहे. पुन्हा एकदा माझ्या कुटुंबासाठी केलेल्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी यावर मात करुन निरोगी परतेन असं आश्वासन देतो”.

दरम्यान अभिषेकने याआधी एक ट्विट करत अमिताभ बच्चन यांचा नवा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिली. अमिताभ बच्चन आता घरातच थांबून आराम करणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे.

११ जुलै रोजी बिग बी व अभिषेक बच्चन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ऐश्वर्या आणि आराध्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आधी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर त्यांनासुद्धा नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं. या दोघींना करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 5:37 pm

Web Title: abhishek bachchan tweets unfortunately due to some comorbidities remain covid 19 positive sgy 87
Next Stories
1 अखेर अमिताभ बच्चन यांचा करोना रिपोर्ट आला निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 ‘माझा होशील ना’ मालिकेच्या सेटवर साजरं झालं रक्षाबंधन
3 सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या कुटुंबीयांची बिहार पोलीस करणार चौकशी
Just Now!
X