News Flash

मराठी चित्रपटांना अॅक्शनची भुरळ

मराठी सिनेमा कात टाकतो आहे हे आपल्याला मराठी चित्रपटांच्या एकंदर वाटचालीवरून दिसून येते आहे.

मराठी सिनेमा कात टाकतो आहे हे आपल्याला मराठी चित्रपटांच्या एकंदर वाटचालीवरून दिसून येते आहे. चित्रपटात कथानकाला फार महत्व दिलं जातंय पण त्यासोबतच कलाकारांच्या भूमिकेलाही तितकाच न्याय दिला जातो आहे. कलाकार आपल्याला भूमिकेला न्याय मिळावा यासाठी जीव तोडून मेहनत करत असतात. सध्या मराठी सिनेमा हा बॉलीवूडच्या तोडीस उतरतो आहे. अगदी हिंदी स्टाईल प्रमाणेच मराठी सिनेसृष्टीतही अॅक्शन सीन्सही अतिशय खुबीने चित्रित केले जात आहेत.रितेश देशमुखचा ‘लय भारी’ आणि गश्मीर महाजानीचा ‘कॅरी ऑन मराठा’ हे दोन्ही सिनेमेसुद्धा अॅक्शन सिक्वेन्स आणि एंटरटेंनमेंटने भरपूर असे होते. अॅक्शन सिक्वेन्सचे प्रयोग सध्या मराठी सिनेसृष्टीत होऊ लागले आहेत. नुकताच रीलीजच्या वाटेवर असलेला ‘दगडी चाळ’ या सिनेमातही आपल्याला अनेक अॅक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात दाखवले गेलेले सीन्स हे वास्तवाच्या अगदी जवळ नेणारे आहेत. दगडी चाळ हे नाव ऐकल तरी आपल्या मनात धस्स होत. पण त्या चाळीविषयी असलेली उत्सुकता मात्र या चित्रपटाने वाढवली आहे. एके काळी या चाळीची दहशत मुंबईवर होती. त्यामुळे मुंबईत ‘दगडी चाळ’ आणि ‘डॅडी’ ही दोन नावं सर्वत्र परिचित होती.  एका चाळीतील एक सामान्य तरुण अपघाताने गुन्हेगारी क्षेत्रात कसा ओढला जातो याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.अंकुशने या सिनेमात एका सामान्य तरुणाची भूमिका साकारली आहे. या सर्व परिस्थितीतून जात असताना हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा दाखवली जाणार आहे. अंकुशचा जबरदस्त पण छोटासा फाईटिंग सिक्वेन्स आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो आहे. तसेच सिनेमातल्या ‘मोरया मोरया’ या गणपतीवरती चित्रित केलेल्या गाण्यातही काही मारेकरी अंकुशला मारण्यासाठी येतात, हे ही गाण्यात दिसून येते. एकंदरीचं हा सिनेमा अॅक्शनने भरपूर असा असणार आहे. सिनेमातल्या फाईटिंग सिक्वेन्ससाठी अंकुशने मेहनतही तितकीच घेतली आहे, यात मात्र शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 12:37 pm

Web Title: action sequence in dagdi chawl movie
Next Stories
1 पुरूषाच्या संघर्षाची आणि बाईच्या अंतरंगाची आगळी वेगळी कथा
2 स्पृहाशी मनमोकळय़ा गप्पा
3 हृतिकच्या ५० कोटींच्या मानधनामुळे ‘मोहेंजोदारो’ अडचणीत?
Just Now!
X