कलर्स हिंदी वाहिनीवर ‘गठबंधन’ ही मालिका लवकरच दाखल होत आहे. यात अभिनेता अब्रार काझीने ‘गठबंधन’मधील त्याची रघू नावाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी संजय दत्तच्या ‘वास्तव’मधील भूमिकेतून प्रेरणा घेतली आहे, असे तो म्हणाला.

गँगस्टरच्या या आगळ्यावेगळ्या प्रेमकथेत अब्रार काझी मराठी मुलगा रघूची भूमिका साकारत आहे. तो गुजराथी मुलगी धनक या आयपीएस ऑफिसरच्या प्रेमात पडतो. मुंबईमध्ये जन्मलेला आणि मोठा झालेला रघू बॉलीवूडचा मोठा चाहता आहे. पण त्याच्या जीवनात काहीही महत्त्वाकांक्षा नाही. आई त्याची सर्वात मोठी ताकत आहे आणि ती त्याची कमजोरीसुद्धा आहे. खऱ्या आयुष्यात अब्रार काझी त्याच्या पडद्यावरील रघूच्या भूमिकेपेक्षा वेगळा आहे, त्यामुळे त्या पात्राच्या अंतरंगात शिरण्यासाठी त्याने वास्तव चित्रपट पाहिला आणि त्यातील संजय दत्तच्या भूमिकेतून त्याला प्रेरणा मिळाली. अब्रार पुढे म्हणाला की माझा आदर्श असलेल्या संजय दत्तच्या रघू या पडद्यावरील नावानेच मी माझे पहिले पदार्पण करत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.