News Flash

६१ व्या वर्षी या अभिनेत्याने घटवले २५ किलो वजन

जाडेपणात ते स्वतःला उत्साही ठेवू शकत नव्हते

सतीश कौशिक

अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक गेल्या काही वर्षांपासून वाढत्या वजनामुळे त्रस्त झाले होते. त्यांच्या वाढत्या वजनामुळे त्यांना इतर शारीरिक व्याधींचाही सामना करावा लागत होता. पण आता सतीश यांनी एक दोन किलो नाही तर तब्बल २५ किलो वजन कमी केले आहे. वजन कमी झाल्यानंतरचा सतीश यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर वजन कमी झाल्यानंतर सतीश यांनी शाद अली यांचा ‘शूरमा’, आशु त्रिखाचा ‘वीरे की वेडिंग’, ‘यमला पगला दिवाना ३’ हे सिनेमे साइनही केले आहेत. तसेच विपुल शहा यांच्या ‘नमस्ते लंडन’ सिनेमातही ते दिसणार आहेत. वजन कमी झाल्यानंतर सतीश यांनी मान्य केले की, जाडेपणात ते स्वतःला उत्साही ठेवू शकत नव्हते.

‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २५ किलो वजन कमी करण्याच्या प्रश्नावर बोलताना कौशिक म्हणाले की, ‘मला कोणताही शारीरिक आजार नव्हता. पण लांबपर्यंत चालताना मला त्रास व्हायचा. गेल्या ४० वर्षांमध्ये मी कोणत्याही ब्रेकशिवाय काम केले. सध्या ज्यापद्धतीचे सिनेमे तयार होत आहेत, त्यात तुम्हाला उत्साही राहणे अत्यंत आवश्यक होते. लॉस एंजेलिसमध्ये मी डॉक्टर क्रिश्चियन मिडलटन यांना भेटलो. त्यांनी मला वजन कमी करण्यासाठी डाएट दिले, याने माझे वजन कमी होण्यास मदत झाली.’

यानंतर हसत सतीश पुढे म्हणाले की, वजन कमी करण्याचे सर्वात मोठे बक्षिस मला तेव्हा मिळाले जेव्हा मी माझ्या मुलीसोबत दुबईतील एका पार्कमध्ये धावलो. आता मी आरोग्यासाठी हानिकारक पदार्थ खातो तर मुलगीच मला ‘तुम्ही परत जाडे व्हाल,’ असे सांगते. डॉक्टरशिवाय निर्माता गुनीत मोंगा आणि अभिनेता अनिल कपूर यांनी वजन कमी करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिल्याबद्दल सतीश यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2018 3:08 pm

Web Title: actor and movie maker satish kaushik is now 25 kg lighter
Next Stories
1 काम मिळवण्यासाठी लोकांचे फोन नंबर चोरायचा रणवीर सिंग
2 दास्तान-ए-मधुबाला भाग- ५
3 महानायक अमिताभ बच्चन यांना वयाच्या ७६ वर्षी हवा जॉब
Just Now!
X