News Flash

स्वत:च्या लग्नासाठी या अभिनेत्याने उघडली ‘मॅट्रिमोनियल साइट’

कोणी वधू देता का वधू...?

आर्य

लग्नासाठी वर किंवा वधू शोधण्यासाठी अनेकजण ‘मॅट्रिमोनियल साइट्स’ची मदत घेतात. मात्र, एका तमिळ अभिनेत्याने जोडीदार मिळावी म्हणून स्वत:चीच एक ‘मॅट्रिमोनियल साइट’ तयार केली. दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता आणि ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ आर्य याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

खरंतर सेटवर कलाकारांची थट्टामस्करी करणं, त्यांच्या खोड्या काढणं यासाठी आर्य ओळखला जातो. त्यामुळे लग्नासाठी ‘मॅट्रिमोनियल साइट’ तयार करुन तो चेष्टा तर करत नाही ना, असंच सुरुवातीला अनेकांना वाटलं. पण ही चेष्टा नसून, इच्छुक तरुणींनी अर्ज करावं असं त्याने स्पष्ट केलं.

वाचा : स्टारडममुळेच दीपिकाने गमावला ‘हा’ चित्रपट

‘साधारणपणे कामाच्या ठिकाणी किंवा मॅट्रिमोनियल साइट्सवर नोंदणी करुन अथवा मित्र-मैत्रिणींमधून लोकं जोडीदार निवडतात. पण मी त्यातला नाही. माझ्या काही मोठ्या अपेक्षा किंवा अटी नाहीत. जर तुम्हाला मी आवडत असेन आणि तुमच्यासाठी योग्य जोडीदार असू शकतो असं वाटत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा. ही थट्टा किंवा मस्करी आहे असं अजिबात समजू नका. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. मी तुमच्या फोनकॉल्सची वाट बघतोय,’ असा संदेश देणारा व्हिडिओदेखील त्याने पोस्ट केला आहे. त्याचबरोबर संपर्कासाठी त्याने फोन नंबरसुद्धा दिला आहे.

आर्यने दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधला असता आर्यचा रेकॉर्ड केलेला आवाज ऐकू येतो. ज्यासोबत ऑटो जनरेटेड मेसेजसुद्धा आपल्या फोनवर येतो. त्या मेसेजमध्ये ‘मॅट्रिमोनियल साइट’ची लिंक दिली जाते. जोडीदार निवडण्यासाठी एखाद्या सेलिब्रिटीने अशी अनोखी संकल्पना वापरण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे अनेकांकडून आर्याचं कौतुक होत आहे, तर अनेकांनी यावर आश्चर्यही व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 5:43 pm

Web Title: actor arya creates his own matrimonial site and invites applications from the public
Next Stories
1 Bigg Boss 11: अर्शी खान खोटारडी, तिच्या आईनेच केला खुलासा
2 पुन्हा एकदा कपड्यांवरुन चर्चेत आली विद्या बालन
3 मिस वर्ल्ड मानुषीवर होणार ‘या’ बक्षिसांची बरसात?
Just Now!
X