21 November 2019

News Flash

लग्नसोहळ्यात कतरिनाचा जलवा, व्हिडीओ व्हायरल

नुकताच कतरिनाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

कतरिना कैफ

बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या ‘भारत’ चित्रपटातील अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या नृत्य कौशल्यामुळे अनेक चाहत्यांची मने जिंकत असते. कतरिनाच्या दिल खेचक अंदाजामुळे तिचे गाणे आणखी खास असते. नुकताच कतरिनाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कतरिनाचा हा व्हिडीओ देहरादूनमधील औली येथील एका लग्नसोहळ्यामधील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये कतरिनाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून कतरिना अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. दरम्यान कतरिना ‘शीला की जवानी’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तसेच बॉलिवूडमधील लोकप्रिय रॅपर बादशाह देखील तेथे पोहोचल्याचे दिसत आहे. ते दोघे ही बादशाहचे प्रसिद्ध गाणे ‘चुल’वर नृत्य करताना दिसत आहे. या दोघांव्यतिरिक्त टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती देखील तेथे हजर असल्याचे दिसत आहे.

‘भारत’ चित्रपटाच्या यशानंतर कतरिना आता लवकरच दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कतरिनासह अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट २२ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on June 23, 2019 3:28 pm

Web Title: actor katrina kaif and rapper badshah performed at a high profile wedding in auli avb 95
Just Now!
X