नायक ते खलनायक आणि पुढे चरित्र अभिनेता अशा प्रदीर्घ कारकिर्दीतील अभिनयाने हिंदी चित्रपटांवर ठसा उमटवणारे अभिनेते प्राण यांची आज जयंती. चित्रपटसृष्टीत सत्तरहून अधिक वर्षे घालवलेल्या व सुमारे ४०० चित्रपटांमध्ये विविधरंगी भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याच्या भूमिकांचा हा थोडक्यात आढावा…

आह (१९५३)
संपूर्ण चित्रपटात डॉ. कैलाशवरच संशय घेतला जातो. मात्र, प्रत्यक्षात ‘आह’मधील भूमिका खलनायकाची नव्हतीच.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

मधुमती (१९५८)
नायिकेवर डोळा ठेवून तिची संपत्ती हडप करण्यासाठी तिच्यामागे लागणारा उग्रनारायण.

जिस देसमे गंगा बहती है (१९६०)
राका या डाकूच्या भूमिकेची रसिकांकडून प्रशंसा.

उपकार (१९६७)
पायाने अधू असणाऱ्या मलंग चाचा खूपच गाजला. एक चरित्र अभिनेता म्हणून विविध भूमिका प्राण यांनी मोठ्या खुबीने केल्या.

जंगल मे मंगल (१९७२)
दुहेरी भूमिका असणारा चित्रपट. एक व्यक्तिरेखा स्त्रीची आणि एक पुरुषाची!

जंजीर (१९७३)
अमिताभच्या डोळ्याला डोळा भिडविणारा शेरखान पडद्यावर रंगविला. गल्लीचा डॉन असणाऱ्या शेरखानची आणि अमिताभची जुगलबंदी पहावी अशीच!

शराबी (१९८४)
दारूच्या आहारी गेलेल्या अमिताभच्या एका प्रचंड पैसा असणाऱ्या बापाची भूमिका. अपत्याच्या प्रेमासाठी तडफडणारा बाप अप्रतिमपणे साकारला.