अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सध्या तो ‘रेस ३’ च्या चित्रीकरणावरच लक्ष केंद्रित करत असला तरीही त्याच्या एका चित्रपटाने चीनमध्ये चांगलीच उसळी घेतली आहे. सलमानचा तो चित्रपट म्हणजे ‘बजरंगी भाईजान’. भारतात २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट काही दिवसांपूर्वी म्हणजेच २ मार्चला चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ‘लिटिल लोलिता मंकी गॉड अंकल’ या नावाने प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’च्या कमाईचे आकडे पाहता प्रेक्षकांना हा चित्रपट भावला आहे हेच स्पष्ट होत आहे.

चीनमध्ये पहिल्याच दिवशी ‘बजरंगी भाईजान’ने २.२४ मिलीयन डॉलर इतकी कमाई केली आहे. कमाईचा हा आकडा गाठत सलमानच्या चित्रपटांच्या यादीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘बजरंगी भाईजानने बाजी मारली आहे. सलमान खान, बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला चीनमध्ये ८००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. भारतात या चित्रपटाने ३२०. ३४ कोटींची कमाई केली होता. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाने फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. त्यामागोमागच आता चीनमध्ये चित्रपटाला मिळारा प्रतिसाद पाहता, ‘बजरंगी….’ची कमाल चीनमध्येही करतोय धमाल, असंच म्हणावं लागेल.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

प्रिय आईस.. तू माझं सर्वस्व होतीस, जान्हवी कपूरने जागवल्या श्रीदेवींच्या आठवणी

कोणताही परदेशी चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी नजरेत घेतल्या जातात. त्या सर्व गोष्टींची पूर्तता करणाऱ्या चित्रपटालाच तेथील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येतं. आतापर्यंत फक्त सलमानच्याच नव्हे, तर आमिरच्या ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांनाही चीनमधील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.