News Flash

VIDEO : माधुरीसोबत सुमीतने अनुभवली ‘पैसा वसूल राइड’

त्यांची ही राइड सोशल मीडियावर चर्चेत

छाया सौजन्य- फेसबुक / सुमीत राघवन

काही अभिनेत्री आपल्याला खऱ्या आयुष्यात भेटल्या तर… अशी कल्पना अनेकांच्याच मनात घर करत असते. या ‘काही’ अभिनेत्रींमध्ये अग्रस्थानी असलेलं एक नाव म्हणजे माधुरी दीक्षितचं. ‘धकधक गर्ल’ माधुरी ही अनेकांच्याच मनाचा ठाव घेते. अशा या सौंदर्यवतीने एकदातरी काही क्षण आपल्यासोबत व्यतीत करावे, ही नाही म्हणता बऱ्याचजणांच्या मनातील इच्छा. अभिनेता सुमीत राघवनची अशीच इच्छा पूर्ण झाली असून, त्याला चक्क माधुरीसोबत कार राइडवर जाण्याची संधी मिळाली.

सुमीतने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन या ‘पैसा वसूल राइड’चा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खुद्द माधुरी दीक्षित शेजारच्या सीटवर बसली असेल तर त्यावेळी कोणा एकाच्या चेहऱ्यावर नेमका ज्या प्रकारचा आनंद असेल, अगदी तसाच आनंद हा व्हिडिओ पाहताना सुमीतच्या चेहऱ्यावर दिसतोय. सुमीतने पोस्ट केलेला हा व्हिडिओ माधुरीच्या आगामी ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाशी निगडीत असल्याचं लक्षात येत आहे. कारण, त्याने या पोस्टमध्ये चित्रपटाविषयीची काही माहितीसुद्धा दिली आहे.

‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील माधुरीच्या लूकवरुन पडदा उचलण्यात आला होता. ज्यामध्ये ती एका गृहिणीच्या रुपात पाहायला मिळाली होती. तेजस देओस्कर दिग्दर्शित तुमची हा चित्रपट एन उन्हाळ्याच्या सुट्टीतच प्रदर्शित होणार आहे असे कळतेय. ‘दार मोशन पिक्चर्स’, ‘डार्क हॉर्स सिनेमाज्’ आणि ‘ब्लू मस्टँग क्रिएशन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रेणुका शहाणे आणि माधुरी तब्बल २३ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.

Padmaavat Review : आश्चर्याच्या परिसीमा ओलांडणारा ‘पद्मावत’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 5:04 pm

Web Title: actor sumeet raghvan and actress madhuri dixit nene car ride paisa vasool ride bucket list watch video
Next Stories
1 सोनाली कुलकर्णीच्या ‘गुलाबजाम’ सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित
2 ‘पद्मावत’ पाहण्याचा पत्नीचा हट्ट तर पतीला हवी सुरक्षेची हमी
3 …तर करण जोहर तुरुंगात जाऊ शकतो
Just Now!
X