टेलिव्हिजन मालिका विश्वात एकेकाळी प्रेक्षकांची मनं जिंकणारी जोडी म्हणजे अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांची. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या निमित्ताने अंकिना आणि सुशांत एकत्र आले होते. ज्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघंही लग्न करणार असं वाटत असतानाच त्यांच्या नात्याला तडा गेला. त्यांच्या चाहत्यांसाठी या सर्व गोष्टी अनपेक्षित होत्या. पण, हीच वस्तूस्थिती होती. ब्रेकअपनंतर सुशांतच्या आयुष्यात अंकिताची जागा भरुन काढण्यासाठी एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली असंही म्हटलं गेलं.

अंकितानेही तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. येत्या काळात ती कंगना रणौतची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘मनिकर्णिका- क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्याच निमित्ताने सध्या तिची एक मुलाखत चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींवरुनही पडदा उचलला आहे.

‘डीएनए’शी संवाद साधताना सुशांतसोबतच्या नात्यात दुरावा आल्याने त्याचा आपल्या कामावर काही परिणाम झाला का, या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं. ‘मला विचाराल तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी आनंदात होते. कोणत्याही गोष्टीची मी कधीच हाव केली नाही. मी काम करत होते, तेव्हाही आनंदात होते, काम करत नव्हते तेव्हाही आनंदात होते. मी या नात्यात ब्रेक घ्यायचं ठरवलं तेव्हाही मी आनंदात होते. तही नियतीचीच इच्छा असावी. कारण, आज त्यामुळेच मी जीवनाच्या या टप्प्यावर उभी आहे. मी असं नाही म्हणू शकत की ब्रेकअपचा माझ्या कामावर काही परिणाम झाला नाही. मुळात प्रेम आणि काम या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही यात समतोल राखणं अपेक्षित असतं. मी असं म्हणेन की, फक्त मला ते करणं मला काही अंशी जमलं नाही’, असं अंकिता म्हणाली.

वाचा : FIFA World Cup 2018 : मच्चाsss… देवभूमी केरळात अशी पसरतीये फुटबॉलची जादू

सुशांतसोबतच्या नात्यात अपयशी ठरल्यानंतर आता पुढे तुझ्या आयुष्यात रिलेशनशिप वगैरेसारख्या गोष्टींना संधी आहे का, असा प्रश्न विचारला असता मिश्किलपणे अंकिता हसली. हसतन तिने उत्तर दिलं, ‘हो अगदी संधी आहे. मी अजुनही माझ्या आयुष्यातील त्या राजकुमाराची वाट पाहतेय. मला कोणत्या पुरुषाचा आधार नकोय, मुळात आयुष्यात कोणत्याच टप्प्यावर पोहोचण्यासाठी मला कोणत्याच पुरुषाचा आधार नको आहे. त्यापेक्षा मला पुरस्कार द्या, असं अंकिताने स्पष्ट केलं.

वाचा : Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्याच्या घडीला बॉलिवूड आणि एकंदर कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत. असं असलं तरीही अंकिता मात्र सध्या लग्नाचा विचार करत नसल्याचं तिने या मुलाखतीतच स्पष्ट केलं. तेव्हा आता या अभिनेत्रीला तिचा प्रिंस चार्मिंग कधी भेटतो, हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे.