28 February 2021

News Flash

अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

ट्विट करून दिली माहिती

संग्रहित छायाचित्र

शिवसेना नेत्या व अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. मातोंडकर यांनी स्वतः यांची ट्विट करून माहिती दिली आहे.

ऊर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करून आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. याची त्यांनी इन्स्टाग्रामकडेही तक्रार नोंदवली आहे. पडताळणी करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करण्यास सांगण्यात आल्या आणि नंतर अकाऊंट हॅक झालं. खरोखर? असं आश्चर्यही त्यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या अकाऊंटवर सध्या इन्स्टाग्रामवर काम सुरू केलं आहे.

ऊर्मिला मातोंडकर या प्रसिद्ध अभिनेत्री असून, त्यांचे अनेक सिनेमे गाजलेले आहेत. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. सुरूवातीला काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली होती. त्यानंतर काँग्रेसचा राजीनामा देत त्यांनी स्वतः काँग्रेसपासून बाजूला केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत नव्याने राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 3:30 pm

Web Title: actress urmila matondkar instagram account hacked bmh 90
Next Stories
1 ‘रुचिका कपूर आणि तिच्या कुटुंबीयांचा…’, शाहीर शेखने केला लग्नाबाबत खुलासा
2 माधुरी दीक्षितने शेअर केला पती आणि मुलांसोबतचा व्हिडीओ, म्हणाली..
3 लता मंगेशकरांनी शेअर केली रेडिओवरील पहिल्या गाण्याची आठवण
Just Now!
X