28 November 2020

News Flash

Video : ‘क्यूँ की तुम मेरी बेटी हो’; देशातील मुलींसाठी विद्या बालनची हृदयस्पर्शी कविता

विद्याने कवितेच्या माध्यमातून दिला मुलींना खास संदेश

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘शकुंतला देवी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या ३१ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शकुंतला देवी यांची भूमिका साकारणाऱ्या विद्याने देशातील मुलींना उद्देशून एक कविता केली आहे.

अनेक वेळा समाजात वावरतांना मुलींवर बंधन असतात. त्यांना कायम चालीरिती,रुढी परंपरा शिकवल्या जातात. प्रत्येक वेळी कसं वागावं आणि कसं वागू नये याचे धडे दिले जातात. परंतु, या सगळ्यात त्या मुलीचं, तिच्या भावनांचा विचार कोणीच करत नाही. अशा मुलींसाठी विद्याने एक कविता केली आहे. तू स्वच्छंदी आहेस, मुक्त आहेस असं म्हणत स्वत:साठी जग असा संदेश विद्याने या कवितेच्या माध्यमातून देशातील मुलींना दिला आहे.

दरम्यान, या चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिका साकारत आहे. तर ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा शकुंतला देवी यांच्या मुलीची भूमिका वठवत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 2:57 pm

Web Title: actress vidya balan dedicates a heartfelt poem to the daughters of india ssj 93
Next Stories
1 ‘पावर स्टार’ला महानगरपालिकेचा दणका; राम गोपाल वर्मांना ठोठावला दंड
2 प्रसाद ओकच्या मुलाला दहावीत मिळाले इतके टक्के; सोशल मीडियावर लिहिली पोस्ट
3 ‘दबंग २’मधील फेविकॉल गाणं ऐकताच करीनाही हसू झालं होतं अनावर; म्हणाली…
Just Now!
X