बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायणने गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी १ डिसेंबर रोजी लग्न केले. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये आदित्यने एका मंदिरात लग्न केले. त्यानंतर त्याने रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या रिसेप्शन पार्टीला भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, गोविंदा अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली. आता आदित्यने पत्नीसाठी एक नवा फ्लॅट खरेदी केला असल्याचे समोर आले आहे.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्यने मुंबईतील अंधेरी येथे ५ बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. त्याचे हे घर त्याच्या आई वडिलांच्या घरापासून जवळ आहे. पुढच्या तीन-चार महिन्यात आदित्य या घरात शिफ्ट होणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
View this post on Instagram
गेल्या १० वर्षांपासून आदित्य श्वेताला ओळखत आहे. शापित चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. आदित्य हा प्रसिद्ध गायक उदीत नारायण यांचा मुलगा आहे. तो देखील गायक आणि अभिनेता आहे. त्याने रिअॅलिटी शो इंडियन आयडलचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचवेळी शोमध्ये नेहा कक्कर परिक्षक म्हणून काम करत होती. त्यावेळी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नेहाने वक्तव्य करत या सर्व चर्चांना पूर्ण विराम लावला होता. आदित्यची गर्लफ्रेंड श्वेता ही एक अभिनेत्री आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 9:56 am