News Flash

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर केल्यानंतर रजनीकांत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

रजनीकांत यांनी केले ट्विट

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. चित्रपटसृष्टीत सर्वात मानाचा असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर ही बातमी मिळाल्यानंतर आता रजनीकांत यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

रजनीकांत यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. “भारत सरकार, आदरणीय आणि प्रियजनांचे मनापासून आभार , नरेंद्र मोदी जी, प्रकाश जावडेकर आणि संपूर्ण ज्युरी यांनी मला एवढा मानाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केल्याने आणि हा पुरस्कार मी माझ्या या प्रवासाचा भाग असलेल्या सगळ्यांना समर्पित करतो. सगळ्यांचे आभार,” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

आणखी वाचा- बस कंडक्टर ते सुपरस्टार; रजनीकांत यांचा प्रेरणादायी प्रवास

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आल्या नंतर सोशल मीडियावर त्यांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. फक्त एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “पिढ्यांपिढ्या लोकप्रिय, वेगवेगळ्या भूमिका, एक प्रेमळ व्यक्तीमत्व…श्री रजनीकांत तुमच्यासाठी..थलायवा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांचे अभिनंदन,” अशा आशायाचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

रजणीकांत लवकरच ‘अण्णाथे’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण चेन्नईत सुरू आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा त्यांचे चाहते करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2021 2:36 pm

Web Title: after announcement dadasaheb phalke award rajinikanth s first tweet goes viral dcp 98
Next Stories
1 ती फायटर आहे आणि…; पत्नी किरणच्या आजारावर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
2 या सिनेमानंतर केला होता तैमूरच्या जन्माचा विचार; फोटो शेअर करत करीना म्हणाली
3 ‘गाडी वाला आया देखो कचरा निकाल’, न्यूड फोटोमुळे परिणिती झाली ट्रोल
Just Now!
X