News Flash

‘बधाई हो’च्या सीक्वेलमध्ये दिसेल ‘ही’ हटके जोडी

या अभिनेत्याने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे

चौकटीबाहेरच्या विषयांना निवडत विविध भूमिकांना प्राधान्य देणाऱ्या अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘बधाई हो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची आणि चित्रपट समीक्षकांची चांगलीच पसंती मिळविली. त्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना ‘बधाई हो 2’ हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.

‘स्पॉटबॉय’नुसार, ‘बधाई हो’नंतर ‘बधाई हो 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटामध्ये आयुषमानच्या जागी अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री भूमि पेडणेकरही या सीक्वलमध्येही झळकणार आहे. विशेष म्हणजे भूमि आणि राजकुमार राव पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘बधाई हो 2’ चं दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

या सीक्वलमध्ये राजकुमार राव एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात झळकणार आहे. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यात काम करणारा तो एकमेव पुरुष असून अन्य सगळ्या महिला पोलीस अधिकारी आहेत. तर भूमि एका शाळेमध्ये क्रीडा शिक्षिका असते.

वाचा : पायल रोहतगीच्या वडिलांचे येस बँकेत अडकले कोट्यवधी रुपये; मागितली पंतप्रधानांकडे मदत

“मी यापूर्वीदेखील पोलिसांची भूमिका साकारली आहे. मात्र या चित्रपटात मी जो पोलिस साकारणार आहे ती भूमिका अन्य भूमिकांपेक्षा वेगळी असणार आहे”, असं राजकुमार म्हणाला.

दरम्यान, ‘बधाई हो’ हा आयुषमानच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात आयुषमानने केलेल्या अभिनयाचं सर्वस्तरांमधून कौतूक करण्यात आलं होतं. या चित्रपटात त्याच्यासोबत गजराज राव, नीना गुप्ता, सुरेखा सीकरी यांनीही स्क्रीन शेअर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 1:47 pm

Web Title: after badhai ho be ready for junglee pictures badhaai do with rajkummar rao and bhumi pednekar ssj 93
Next Stories
1 मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर शिल्पाचा टिक-टॉक अंदाज, व्हिडीओ व्हायरल
2 ..म्हणून आजवर करिश्मासोबत केलं नाही काम- करीना कपूर खान
3 ‘सावत्र आई’ होण्याच्या टॅगवर करीनानं सोडलं मौन, म्हणाली…
Just Now!
X