News Flash

नवविवाहित गौहरला विमानात अचानक भेटला एक्स बॉयफ्रेंड, कुशल म्हणाला..

'बिग बॉस'मध्ये सहभागी झाल्यानंतर गौहर आणि कुशलच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार यांच्या निकाहची चर्चा सुरु होती. निकाहपूर्वी आणि त्यानंतर रंगलेल्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. २५ डिसेंबर रोजी या दोघांचा निकाह झाला. निकाहच्या फोटोमुळे गौहर चर्चेत होती. मात्र, गौहर आता तिच्या लग्नामुळे नाही तर लग्नाच्या दोन दिवसानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनला भेटल्याने ती चर्चेत आली आहे.

गौहर निकाहच्या दोन दिवसानंतर लखनऊला चित्रीकरणासाठी गेली. त्यावेळी विमानातील प्रवासादरम्यान गौहरची तिचा एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनशी अचानक भेट झाली. कुशलने या भेटीला व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला. “मी माझ्या घरी जात होतो आणि अचानक माझ्या एका जुन्या मैत्रिणीची भेट झाली. तिचं नुकतंच लग्न झालं आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. ही मैत्रीण आहे गौहर खान. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. हाय किस्मत”, असं तो या व्हिडीओत बोलताना दिसतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

गौहर आणि कुशालने बिग बॉसच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. यावेळी दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉसनंतरही हे दोघं अनेकदा एकत्र दिसायचे. पण त्यांचं हे अफेअर फार काळ टिकलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 10:33 am

Web Title: after marriage gauahar khan met her ex boyfriend kushal tandan dcp 98
Next Stories
1 हे काय? या मराठी अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी लावला चेहरा आणि अंगाला
2 ‘सँडविच फॉरेव्‍हर’मध्‍ये दिसणार अतुल कुलकर्णीची विनोदी शैली
3 रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
Just Now!
X