News Flash

ट्रोल करणाऱ्याला रेणुका शहाणेंनी शिकवला धडा

रेणुका शहाणेंच्या उत्तरानंतर त्याने ट्विटर अकाऊंटच डिलिट केले.

अभिनेत्री रेणुका शहाणे

बॉलिवूडमधील कलाकार असो किंवा मराठी चित्रपटांतील, अनेकांना सोशल मीडियावरील टीकांना सामोरे जावे लागतेय. सोशल मीडिया सध्या सर्वांच्याच जीवनातील एक अविभाज्य घटक झालाय असे म्हणायला हरकत नाही. एखाद्याने पोस्ट केल्यावर त्यावर अनेकांची मते, टीका यांना सामोरे जावेच लागते. त्यातही सेलिब्रिटी असल्यावर अनेकदा त्यांच्या कपड्यांवरून, मतांवरून, पोस्टवरून ऑनलाइन ट्रोलला सुरुवात होते. अभिनेत्री रेणुका शहाणेसोबतच अशीच घटना घडली. अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्यावर रेणुका यांनी केलेल्या ट्विटवर नेटीझन्सकडून टीकांचा भडीमार झाला.

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १४ जण या घटनेत जखमी झाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून रेणुका शहाणे यांनी या हल्ल्याचा निषेध केला. ‘अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला आणि अतिरेक्यांकडून पोलिसांची हत्या या घटना अत्यंत भयानक आहेत. निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. हा द्वेष थांबवा #StopThisHate’ असे ट्विट त्यांनी केले. या ट्विटनंतर नेटीझन्सकडून टीका होऊ लागली. अनेकांनी रेणुकाच्या या पोस्टविरोधात ऑनलाइन ट्रोलमध्ये अपशब्दही वापरले.

रेणुका यांनी या ऑनलाइन ट्रोलविरोधात आवाज उठवला. अपशब्द वापरणाऱ्या एका ट्विटर युजरची पोस्ट शेअर करत त्यांनी प्रत्युत्तर दिले. ‘अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याच्या पोस्टनंतर ट्विटरवर माझ्यावर अशा प्रकारे टीका करण्यात आली. इतरही असे अनेक पोस्ट आहेत. मात्र हा जो कोणी महान संस्कारी मुलगा आहे, तो नक्कीच सभ्य माणूस नाही. मी पुन्हा सांगतेय की हा द्वेष थांबवा #StopThisHate’ असे ट्विट करत रेणुका यांनी त्या ट्विटर युजरला समज दिली.

renuka-tweet

रेणुकाच्या उत्तरानंतर आपली चूक उमगताच त्या ट्विटर युजरने माफी मागत पुन्हा एक पोस्ट केली. इतकेच नाही तर ते अपशब्द मी वापरले नसून माझ्या मित्राने माझ्या फोनवरून तो ट्विट केला असे त्याने म्हटले. त्यानंतर ट्विटर अकाऊंटच त्याने डिलिट केले. ऑनलाइन ट्रोलला रेणुकाने परखडपणे आणि तितक्याच सामंजसपणे उत्तर देऊन टीकाकारांचे तोंड बंद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 9:14 am

Web Title: after renuka shahane shamed a troll publicly he deleted his twitter account
Next Stories
1 कथा पडद्यामागचीः रंगभूमी हीच आई आणि पहिलं प्रेम- मयुरेश पेम
2 शब्दांच्या पलीकडले : आजा सनम मधुर चांदनी में हम
3 VIDEO : कंदील बलोचच्या बायोपिकचा टिझर वेगळच सत्य उघड करतोय
Just Now!
X