03 June 2020

News Flash

‘अग्गंबाई सासूबाई’ फेम तेजश्रीने श्रीदेवींना वाहिली अनोखी श्रद्धांजली

तेजश्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.

तेजश्री प्रधान, श्रीदेवी

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत शुभ्राची भूमिका साकारत अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या स्मृतिदिनानिमित्त तेजश्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. तेजश्रीने श्रीदेवी यांच्या ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातील चार्ली चॅप्लीन लूकमध्ये फोटोशूट केलं. या फोटोशूटमधील एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘प्रेम आणि आदर’, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

दुबईत एका लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचं बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनाला दोन वर्षे झाली असून टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे आदरांजली वाहिली.

तेजश्रीबद्दल बोलायचे झाल्यास, तिची शुभ्रा ही भूमिका घराघरांत पोहोचली आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. अनोखी संकल्पना आणि दमदार कलाकार यांमुळे टीआरपीच्या यादीतसुद्धा ही मालिका वरचढ ठरतेय. तेजश्रीसोबतच मालिकेत निवेदिता सराफ, गिरीश ओक, आशुतोष पत्की आणि रवी पटवर्धन हे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 6:29 pm

Web Title: aggabai sasubai fame tejashree pradhan remembers sridevi on her second death anniversary ssv 92
Next Stories
1 आजही मराठी कलाकार ठाम भूमिका घेऊ शकत नाहीत- डॉ. अमोल कोल्हे
2 “आम्ही रस्त्यावर पडलेल्या मुली नाही”; लग्नाविषयीच्या चर्चांवरून ट्रोल करणाऱ्यांना सोनालीने सुनावलं
3 श्वेताची देवदत्तसोबत कॉफी डेट
Just Now!
X