News Flash

‘कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा…’, मोहब्बतेमधील ऐश्वर्याबाबत फराह खानने केला खुलासा

या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत.

नुकतीच ‘मोहब्बते’ या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान कोरिओग्राफर फराह खानने चित्रपटाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने ऐश्वर्याला एक प्रोफेशनल अभिनेत्री असल्याचे म्हटले आहे. कोणतीही तक्रार न करता ती मोहब्बते चित्रटाचे चित्रीकरण करत होती असे फराह खानने म्हटले आहे.

‘ऐश्वर्या एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने लंडनमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा चित्रीकरण केले. तिने सफेद रंगाच्या साडीमध्ये इतक्या थंडीत चित्रीकरण केले पण कधीही तक्रार देखील केली नाही. चित्रपटातील तिची आणि शाहरुखची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे’ असे फराह म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘आम्ही लंडनमध्ये चित्रीकरण केले. तिकडे पावसात आम्ही भिजलो, कडाक्याच्या थंडीमध्ये देखील चित्रीकरण केले. दोन गाण्यांच्या चित्रीकरणासाठी आम्हाला न्यूझीलंडला जावे लागले.’

अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायच्या ‘मोहब्बते’ या चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. तसेच या चित्रपटात जिमी शेरगील, प्रीती झिंगयानी, उदय चोप्रा, शमिता शेट्टी, जुगल हंसराज, किम शर्मा, अर्चना पूरण सिंह आणि अनुपम खेर हे कालाकार देखील आहेत. त्यावेळी हा चित्रपट हिट ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 1:47 pm

Web Title: aishwarya rai bachachan shot in freezing cold without complaint says farah khan on mohabbatein avb 95
Next Stories
1 “इथे केलेला कचरा सोबत घेऊन जा”; गोव्याच्या मंत्र्यांचा करण जोहरला दम
2 जान कुमारच्या आईनंही मागितली मराठी भाषिकांची माफी; म्हणाल्या, “माझ्या मुलाला…”
3 ‘प्रियांकाने कायम मला…’; ‘फॅशन’च्या सेटवर अशी होती देसी गर्लची वागणूक
Just Now!
X