20 September 2018

News Flash

‘मोहब्बत’मध्ये या आंतरराष्ट्रीय नृत्यदिग्दर्शकाच्या स्टेप्सवर थिरकली ऐश्वर्या!

या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध अमेरिकन कोरिओग्राफर फ्रँक गॉटसन ज्यूनिअरनं या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

नुकताच 'फन्ने खान' चित्रपटातलं "मोहब्बत"हे गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं.

ऐश्वर्या, राजकुमार राव, अनिल कपूर, पिहू संद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘फन्ने खान’ चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. नुकतंच या चित्रपटातलं “मोहब्बत”हे गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं. ऐश्वर्या रायवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. ऐश्वर्या या चित्रपटात बेबी सिंग या गायिकेची भूमिका साकारत आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध अमेरिकन कोरिओग्राफर फ्रँक गॉटसन ज्यूनिअरनं या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे.

HOT DEALS
  • Sony Xperia XA Dual 16 GB (White)
    ₹ 15940 MRP ₹ 18990 -16%
    ₹1594 Cashback
  • MICROMAX Q4001 VDEO 1 Grey
    ₹ 4000 MRP ₹ 5499 -27%
    ₹400 Cashback

फ्रँकनं याआधी बेयॉन्से, रिहाना, जेनिफर लोपेझच्या गाण्यांसाठीही नृत्यदिग्दर्शन केलं आहे. बेयॉन्सेसाठी त्यानं १७ व्हिडिओंचं नृत्यदिग्दर्शन त्यानं केलं आहे. त्याचप्रमाणे अनेक बड्या पॉप सिंगरच्या वर्ल्ड टुरचंही नृत्यदिग्दर्शन करण्याचा अनुभव फ्रँककडे आहे. ऐश्वर्याही या चित्रपटात पॉप सिंगर दाखवल्यानं फ्रँकच उत्तम कोरिओग्राफर असू शकतो असा विश्वास दिग्दर्शक अतुल मांजरेकरांना आहे.

या चित्रपटाच्या निमित्तानं ऐश्वर्या पहिल्यांदाच पॉप सिंगरच्या भूमिकेत असणार आहे. याआधी ‘ताल’ चित्रपटात तिनं गायिकेची भूमिका साकारली होती. आपल्या मुलीला गायिका बनवण्यासाठी धडपडणाऱ्या बापाची गोष्ट ‘फन्ने खान’मधून पाहायला मिळणार आहे. ‘फन्ने खान’ चित्रपटाच्या निमित्तानं ऐश्वर्या आणि अनिल कपूर ही जोडी अठरा वर्षांनी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या आणि अनिल कपूर यांनी ‘ताल’, ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात काम केलं आहे. ३ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

First Published on July 11, 2018 5:52 pm

Web Title: aishwarya rai bachchan fanney khan song mohabbat watch video