बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे वडील कृष्णराज राय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडिलांच्या तब्येतीचे कळले तेव्हा ऐश्वर्या दुबईमध्ये होती पण लगेच ती मुंबईत दाखल झाली. ऐश्वर्या दुबईला अभिषेक आणि आराध्या यांच्यासोबत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेली होती. अभिषेकला काही कामानिमित्त न्यू यॉर्कला जावे लागले होते. पण तोही काम संपवून लवकरच मुंबईत आला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याच्या वडिलांना गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा अभिषेक न्यू यॉर्कमध्ये होता तोपर्यंत एकटी ऐश्वर्याच बाबांची काळजी घेत होती. पण आता अभिषेकही परत आला आहे. नुकताच आराध्याच्या शाळेत क्रीडा दिवस होता. तेव्हा ऐश्वर्या आराध्यासोबत इतर मुलांनाही चिअर करताना दिसली होती. पण त्याचवेळी ती आपल्या बाबांचीही योग्य ती काळजी घेत होती.

रुग्णालयाशी संबंधीत एका सुत्राने सांगितले की, ऐश्वर्या नेहमीच रुग्णालयात बाबांना बघण्यासाठी येते. त्याचबरोबर ती मुलीचीही तेवढीच काळजी घेते. अभिषेकही रुग्णालयात येत असतो आणि ऐश्वर्याची मदत करतो.