10 August 2020

News Flash

सास-यांसमोर भाव न मिळाल्याने ऐश्वर्या नाराज?

ऐश्वर्याच्या चेह-याचा रंग उडाला होता.

सास-यांसमोर आपल्याला कोणीच भाव न देत असल्याचे ऐश्वर्याला कळले

बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर मोठ्यातला मोठा कलाकार छोटा पडतो. मग त्यांच्यासमोर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची तरी काय बिशाद असणार? नुकतेच अमिताभ बच्चन हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एका पार्टीला उपस्थित राहिले होते. पण, तिथे जो प्रकार घडला त्याने ऐश्वर्या काहीशी नाखूश झाल्याचे म्हटले जातेय. ऐश्वर्याने छायाचित्रकारांना फोटो काढण्यासाठी पोज दिली असता सर्व छायाचित्रकार तिचे फोटो काढायचे सोडून लगेच बिग बींचे फोटो काढण्यासाठी धावले. या गोष्टीने नाराज झालेली ऐश्वर्या पार्टीत न जाताच तेथून घरी परतली. हिंदुस्थान समाचार या संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सास-यांसमोर आपल्याला कोणीच भाव न देत असल्याचे ऐश्वर्याला कळले. त्यामुळे तिचा चेहरा पडला होता. सदर घटनेनंतर ऐश्वर्याने आपली तब्येत ठीक नसल्याचे कारण सांगत पार्टीतून काढता पाय घेतला, असे उपस्थितांनी सांगितले. तिच्यासोबत असा किस्सा काही पहिल्यांदा घडलेला नाही. याआधी एका पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्या ही बच्चन कुटुंबाविषयी बोलण्यासाठी पुढे जात होती. तेव्हा सूत्रसंचालकाने तिला थांबवून अमिताभ यांना मंचावर येण्यास आमंत्रित केले. तेव्हाही ऐश्वर्याच्याचेह-याचा रंग उडाला होता. तसेच, तेव्हा तिने  प्रसार माध्यमांना मुलाखत देण्यासही नकार दिलेला.

अमिताभ बच्चन यांची बॉलीवूडमध्ये असलेली प्रसिद्धी सर्वज्ञात आहे. पण, घरात जया बच्चन यांचेच राज्य असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ब-याचदा ऐश्वर्याचे चालत नाही. याचेच उदाहरण जज्बा चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी पाहावयास मिळाले. स्क्रिनिंगवेळी ऐश्वर्याने तिच्या आई-वडिलांना मंचावर बोलावून त्यांचा आशीर्वाद घेतला होता आणि त्यांचे आभारही मानले होते. पण, त्याचवेळी बाजूला बसलेल्या सासू सास-यांकडे तिने दुर्लक्ष केले होते.

View this post on Instagram

Yo baby 👶

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 6:09 pm

Web Title: aishwarya rai bachchan got angry when photographers clicks amitabhs photos instead of her
Next Stories
1 रेहा चक्रबर्तीचा हे बोल्ड लूक पाहिले का?
2 VIDEO: अक्षय कुमारचे आलिशान घर पाहिले का?
3 ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे ‘हमसफर’ गाणे मनाला भिडणारे
Just Now!
X