News Flash

पुनरागमनाबाबत ऐश्वर्याची नकारघंटा

दाक्षिणात्य दिग्दर्शक पी. वासू यांनी स्वत:च आपल्या आगामी चित्रपटासाठी ऐश्वर्याचे नाव निश्चित झाल्याचे नुकतेच जाहीर केले होते.

| February 21, 2014 05:45 am

दाक्षिणात्य दिग्दर्शक पी. वासू यांनी स्वत:च आपल्या आगामी चित्रपटासाठी ऐश्वर्याचे नाव निश्चित झाल्याचे नुकतेच जाहीर केले होते. मात्र, माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने याबाबत नकार दिला आहे.
ऐश्वर्याचे प्रवक्ता म्हणाले की, ऐश्वर्या राय बच्चन या पी.वासू यांच्या चित्रपटात काम करणार असल्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये जोर धरू लागली आहे. पण, सर्व संबंधित व्यावसायिकांचा आदर करत मी सांगू इच्छितो की, ऐश्वर्या यांच्याकडे आलेल्या काही स्क्रिप्टपैकी पी.वासू यांच्या चित्रपटाची एक स्क्रिप्ट आहे. मात्र, चित्रपटात काम करण्यास त्यांनी अद्याप होकार कळविलेला नाही. माध्यमांमध्ये पसरलेल्या या बातमीबद्दल आम्हालाही आश्चर्य वाटत आहे.
ऐश्वर्या परत येतेय?
‘चंद्रमुखी’ आणि ‘चायना थंबी’सारखे हिट दाक्षिणात्य चित्रपट देणाऱ्या पी. वासू यांनी नुकतेच ऐश्वर्या त्यांच्या चित्रपटात काम करणार असल्याचे जाहीर केले होते. प्रेस रिलीजमध्ये वासू म्हणाले होते की, ऐश्वर्या चित्रपटाच्या स्क्रिप्टने प्रभावित झाली आहे. यापूर्वी तिने कधीही न साकारलेल्या शक्तिशाली भूमिकेत ती दिसेल. ‘कलारी’ लढवय्याची ऐश्वर्या भूमिका साकारणार असून, यासाठी ती विशेष प्रशिक्षणही घेणार आहे.
ऐश्वर्या ही पती अभिषेक बच्चनसोबत चित्रपट करणार असल्याचीही मध्यंतरी चर्चा होती. पण, याबद्दल अद्याप काही वृत्त आलेले नाही. आराध्याला जन्म देण्यापूर्वी २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘गुजारिश’ चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 5:45 am

Web Title: aishwarya rai bachchan issues statement denies playing a kalari warrior
टॅग : Entertainment News
Next Stories
1 पाहाः वरूण, इलियाना आणि ‘बेशरमी की हाइट’
2 ‘फँड्री’ १२ राज्यांत झळकणार
3 आयपीएल कमी पडलं? शाहरुखला लागले फूटबॉल संघाचे वेध
Just Now!
X