14 October 2019

News Flash

राजामौलींच्या ‘RRR’ चित्रपटात आलिया-अजय साकारणार महत्त्वाची भूमिका

दोन वर्षांपूर्वी एस. एस. राजामौलींच्या चित्रपटांनी जगभरात इतिहास घडवला होता. ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि त्यानंतर ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी सगळ्यांनाच थक्क करुन

राम चरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगन

दोन वर्षांपूर्वी एस. एस. राजामौलींच्या चित्रपटांनी जगभरात इतिहास घडवला होता. ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि त्यानंतर ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी सगळ्यांनाच थक्क करुन सोडले होते. आता राजामौलींचा ‘RRR’ चित्रपट येत आहे. चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.

चित्रपट संबंधात काही महत्वाच्या घोषणा करण्यासाठी राजामौली यांनी हैद्राबाद येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत टॉलिवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर देखील उपस्थित होते. या दरम्यान चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्टसह अभिनेता अजय देवगनही झळकणार असल्याची घोषणा राजामौलींनी केली. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.

‘RRR’ चित्रपटात अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर स्वातंत्र सैनिकांची भुमिका साकारणार असून आलिया भट्ट आणि अजय देवगन सहाय्यक कलाकार असणार आहेत. ‘अजय देवगनने चित्रपटात महत्वाची भुमिका साकारण्यास होकार दिला आहे. तो या चित्रपटाचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे’ असं राजामौली यांनी ट्विट केले आहे. आलिया भट्टने ‘राजामौलींसोबत काम करणे म्हणजे माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छापूर्ण होण्यासारखे आहे. त्याच बरोबर राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सहसुद्धा. मी दक्षिणात्य चित्रपटात पहिल्यांदा काम करणार असून मी त्यासाठी फार उत्साही आहे’ असं ट्विट केले आहे.

‘RRR’ चित्रपट ३० जुलै २०२०ला प्रदर्शित होणार असून तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे.

First Published on March 14, 2019 6:03 pm

Web Title: ajay devgn and alia bhatt join ss rajamoulis rrr movie