27 November 2020

News Flash

अजय विसरला होता लग्नाची तारीख, अशी होती काजोलची प्रतिक्रिया

एका शोमध्ये अजयला लग्नाची तारीख विचारण्यात आली होती.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेता अजय देवगण आणि काजोल. ते सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. अजय आणि काजोलने २१ वर्षांपूर्वी लग्न केले आहे. पण अजय एका कार्यक्रमात त्याच्या लग्नाची तारीख देखील विसरला होता.

एकदा अजयने कॉफी विथ करण या करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान करणने रॅपिड फायर राऊंडमध्ये अजयला त्याच्या लग्नाची तारीख विचारली होती. त्याच्या या प्रश्नाचे उत्तर अजय देऊ शकला नाही. त्यावेळी अजय सोबत या शोमध्ये काजोल देखील उपस्थित होती.

रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने लग्नाची तारीख विचारताच अजय देवगणला उत्तर देता आले नाही. लग्नाची तारीख अजय विसरल्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या काजोलला अजयचे हे विसरणे आवडले नाही. तिने त्यावर निराजी व्यक्त केली.

त्यानंतर ‘दिलवाले’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोल आणि शाहरुख खान कॉफी विथ करण शोमध्ये पोहोचले होते. त्यावेळी शाहरुखला अजय आणि काजोलच्या लग्नाची विचारण्यात आली होती. करणने शोमध्ये शाहरुखला काजोलच्या लग्नाची तारीख विचारताच त्याने दोन सेकंद विचार केला आणि २४ फेब्रुवारी १९९९ असे म्हटले. शाहरुखने योग्य उत्तर दिल्यामुळे कजोलला देखील आनंद झाला.

काजोल आणि अजयने २४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न केले. सुरुवातीला काजोलच्या वडिलांनी तिच्या लग्नासाठी नकार दिला होता. काजोलने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी काजोलच्या घरातील देखील लग्नासाठी तयार झाले. अतिशय खासगी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पाडला. अजय आणि काजोलच्या लग्नाला काही मोजक्याच लोकांनी हजेरी लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 8:57 am

Web Title: ajay devgn forgot his wedding date avb 95
Next Stories
1 नवमाध्यमांच्या लाटेवरचे नवे चेहरे
2 तुषारचा लक्ष्मी बॉम्ब 
3 खुसखुशीत मामला!
Just Now!
X