बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान निर्माता संजय गुप्ता यांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. कुटुंबीयांसोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहताना मजा आली असं ते म्हणाले. त्याच्या या विधानावर अभिनेता कमाल आर खान याने निशाणा साधला आहे. मित्रा चित्रपटाला घरातच पाहा कारण फुकट देखील आता कोणी थिएटरमध्ये येणार नाही. असा टोला त्याने लगावला आहे.

अवश्य पाहा – याला म्हणतात खरा सुपरस्टार; चित्रपटातून केलं बाहेर पण एका सीनसाठी घेतले ७४ कोटी

अवश्य पाहा – अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज

कमाल आर. खान उर्फ केआरके आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने ‘लक्ष्मी’ चित्रपटाच्या निमित्ताने संजय गुप्ता यांच्यावर निशाणा साधला आहे. “मित्रा थिएटरचा कारभार आता संपला आहे. आता प्रेक्षक फुटक देखील सिनेमागृहांमध्ये जाणार नाहीत. जर मी घरातच बसून आपल्या कुटुंबीयांसोबत चित्रपटा पाहू शकतो तर मी थिएटरमध्ये का जाऊ? पैसे आणि वेळेच खराब करण्यासाठी आता कोणी थिएटरमध्ये जाणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने केलं आहे.

यापूर्वी देखील केआरकेने ‘लक्ष्मी’ चित्रपटावर टीका केली होती. “देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचं प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा. म्हणावं हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.