01 March 2021

News Flash

‘सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये मला हीन वागणूक मिळाली’

अक्षय कुमारने सांगितला स्ट्रगलिंगच्या काळातला तो प्रसंग

अक्षय कुमार

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार सध्या जरी यशस्वी अभिनेत्यांपैकी एक असला तरी करिअरच्या सुरुवातीला आपणही हीन वागणुकीला सामोरे गेल्याचे त्याने सांगितले. ‘स्पेशल २६’, ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’ यांसारखे बरेच सुपरहिट चित्रपट अक्षयने बॉलिवूडला दिले. मात्र, अभिनेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या त्याने किती सुपरहिट आणि किती फ्लॉप चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या यावर अवलंबून असल्याचे त्याने स्पष्ट केले.

एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अक्षयने हा प्रसंग सांगितला होता. ‘हो, मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. जेव्हा मी दोन नायक असलेल्या चित्रपटांमध्ये काम करत होतो, तेव्हा माझे तीन- चार चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले, पण त्या दुसऱ्या अभिनेत्याचे चित्रपट सुपरहिट ठरले होते. आमच्या दोघांच्या भूमिका समान महत्त्वाच्या होत्या, तरीही त्याला हॉटेलमध्ये आलिशान रुम मिळायचा आणि मला साधा रुम मिळायचा. त्याला सेटवर पोहोचण्यासाठी कार पाठवली जात असे, तर मला बसने यायला सांगितले जायचे. इंडस्ट्रीत असे खरेच घडते.’

Happy Birthday Akshay Kumar : बॉलिवूडच्या ‘खिलाडी’बाबत काही रंजक गोष्टी

‘बॉक्स ऑफीसवर चित्रपटांची कमाई चांगली झाली की इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांशी तुमचे संबंध चांगले होऊ लागतात. हॉटेलमध्ये आलिशान रुम दिले जातात. इतकेच नाही तर एखाद्या चित्रपटाने अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी केली की प्रवासासाठी प्रायवेट जेटसुद्धा दिला जायचा. माझ्या साडेसत्तावीस वर्षांच्या करिअरमध्ये फक्त तीन ते चार वेळा वाईट काळ आला, मात्र अपयशाने मी खचलो नाही. अपयश आणि यशाला कधीही गंभीरतेने घेऊ नका. कारण परिस्थिती नेहमीच सारखी राहत नाही,’ असे त्याने सांगितले होते.

सध्या अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये सर्वांत लोकप्रिय अभिनेता आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हताच. कदाचित या संघषार्मुळेच अक्षय बॉलीवूडमधला ‘सबसे बडा खिलाडी’ ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2018 11:33 am

Web Title: akshay kumar birthday special at the beginning of the career i was made to feel like an outcast on a film set said akshay
Next Stories
1 सोनाली बेंद्रेच्या मृत्यूच्या अफवांवर तिचा पती म्हणाला…
2 ‘बॉईज २’मधील धमाल गाणे प्रदर्शित
3 बिग बॉस परतला
Just Now!
X