24 October 2019

News Flash

मुलासाठी अक्षय कुमारची भावनिक पोस्ट

आरव लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

ट्विंकल आणि अक्षयचा मोठा मुलगा आरवचा वाढदिवस आहे.

चित्रपटांमधील काम आणि आपले कुटुंब यामध्ये योग्य तो समतोल राखण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचे नाव न चुकता घेतले जाते. व्यग्र वेळापत्रक असूनसुद्धा तो पत्नी व मुलांना पुरेपूर वेळ देतो. मोठ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अक्षयने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

मुलगा आरवचा फोटो पोस्ट करत अक्षयने इन्स्टाग्रामवर लिहिलं, ‘माझ्या वडिलांकडून शिकलेली एक गोष्ट म्हणजे जेव्हा कधी माझ्या हातून काही गोंधळ झाला तेव्हा मी थेट त्यांच्याकडे जाऊन सांगू शकत होतो. माझे बाबा मला मारतील असा विचार कधीच मनात आला नाही. आज तुझ्या स्पीड डाएलमध्ये माझा नंबर असणे म्हणजे मी सुद्धा बाबा म्हणून माझं काम योग्यरित्या पार पाडतोय. तुझं मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच तुझ्या बाजूला उभा राहीन. वाढदिवसाच्या शुभेच्छा आरव.’

आरव १७ वर्षांचा असून तोसुद्धा पुढे बॉलिवूडमध्ये करिअर करणार असल्याच्या चर्चा आहेत. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमसोबत आरव ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या गाजलेल्या चित्रपटाच्या रिमेकमधून पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात अक्षय व सैफ मुख्य भूमिकेत होते.

First Published on September 16, 2019 3:40 pm

Web Title: akshay kumar emotional post for son aarav bhatia ssv 92