सोशल मीडियावर सध्या थ्रोबॅक कॉन्टेंटचा ट्रेंड सुरु आहे. अनेक मंडळी आपले जुने फोटो किंवा व्हिडीओज सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा देत आहेत. दरम्यान अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आपले हसू आवरता येणार नाही.
असं काय आहे या व्हिडीओमध्ये?
इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय आणि विद्या चक्क फाईटिंग करताना दिसत आहेत. अक्षय विद्याला पंच मारतोय आणि ती अक्षयवर पलटवार करत आहे. हा गंमतीशीर व्हिडीओ गेल्या वर्षीचा आहे. दोघांचा गेटअप पाहून हा व्हिडीओ ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काढला गेल्याची शक्यता आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. खिलाडी कुमारला आजवर आपण अनेक खलनायकांशी दोन हात करताना पाहिले आहे. मात्र अभिनेत्रीशी फाईटिंग करताना त्याला पहिल्यांदाच पाहिले जात आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.