बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री करिना कपूर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘गुड न्यूज’ हा विनोदीपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तिकीटबारीवर १७.५० कोटी रुपयांची घसघशीत कमाई करणाऱ्या या चित्रपटाने २०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यानंतर आता हा चित्रपट हॉगकॉंगमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन हा चित्रपट आता हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं. हा चित्रपट १३ फेब्रुवारी २०२० ला हाँगकाँगमधील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनअंतर्गत करण्यात आली आहे. तर दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. Bringin’ out all smiles, lots of laughter & a bunch of #GoodNewwz! Now releasing in #HongKong on 13th February’20!@akshaykumar #KareenaKapoorKhan @diljitdosanjh @advani_kiara @karanjohar @apoorvamehta18 @ShashankKhaitan @raj_a_mehta pic.twitter.com/gSdQK4YF0Y — Dharma Productions (@DharmaMovies) February 1, 2020 सरोगेसीवर आधारित हा चित्रपट २७ डिसेंबर २०१९ रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भारतात २०४.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटानंतर अक्षय त्याच्या आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटाकडे वळला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि जॅकी श्रॉफ स्क्रीन शेअर करणार आहेत.