बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आले. येत्या काळात ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या यादित आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. या आगामी चित्रपटाचे नाव ‘बाप रे बाप’ असे आहे.
अवश्य वाचा – नेहा कक्कर संतापली; सहकलाकाराच्या लगावली कानशीलात
अवश्य पाहा – ‘या’ श्रीमंत अभिनेत्रीसमोर शाहरुख खानही वाटतो गरीब
अवश्य पाहा – जन्माने पुरुष असलेल्या अभिनेत्री
अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा
या चित्रपटात एक नव्हे, दोन नव्हे तर तीन तीन अक्षय कुमार पाहायला मिळणार आहेत. ‘बाप रे बाप’मध्ये अक्षय ट्रिपल रोल करणार आहे. अक्षयने स्वत: सोशल मीडियावर या चित्रपटाचा पहिला पोस्टर शेअर केला आहे. “एक से भले दो, दो से भले तीन बाप रे बाप” असे म्हणत अक्षयने पोस्ट केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अवश्य पाहा – संसदेत घुसला कोल्हा
अक्षयने आपल्या सिनेकारकिर्दीत पहिल्यांदाच ट्रिपल रोल करणार आहे. दरम्यान अक्षयने चित्रपटाचे कथानक, दिग्दर्शक, किंवा प्रदर्शनाची तारीख याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. यापूर्वी अक्षयला प्रेक्षकांनी एका जाहिरातीत ट्रिपल रोल करताना पाहिले आहे. या पार्श्वभूमीवर आता चाहते एकाच चित्रपटात तीन अक्षय कुमार पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.