News Flash

अक्षय आणखी एक थरारपट घेऊन सज्ज, ‘एअरलिफ्ट’चा टीझर प्रदर्शित

बॉलीवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'एअरलिफ्ट'चा टीझर प्रदर्शित झाला आहे.

'बेबी', 'हॉली-डे', 'गब्बर' या चित्रपटानंतर अक्षय पुन्हा एकदा 'एअरलिफ्ट' या थरारपटातून चित्रपट रसिकांचे मन जिंकण्यास सज्ज झाला आहे

बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘एअरलिफ्ट’चा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘बेबी’, ‘हॉली-डे’, ‘गब्बर’ या चित्रपटानंतर अक्षय पुन्हा एकदा ‘एअरलिफ्ट’ या थरारपटातून चित्रपट रसिकांचे मन जिंकण्यास सज्ज झाला आहे. नव्वदच्या दशकात कुवेतमध्ये भारतीयांसमोर निर्माण झालेले पेचप्रसंग आणि तेथील भारतीयांना परत आणण्यासाठी हाती घेण्यात आलेले मिशन या सत्य घटनेवर ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटाचे कथानक आहे.

अक्षय या चित्रपटात रणजित कतियाल या कुवेतस्थित भारतीय उद्योजकाची भूमिका साकारत आहे. चित्रपट ९० च्या दशकात घेऊन जाणारा असून नामवंत उद्योजक असूनही कुवेतमध्ये त्यावेळी निर्माण झालेले युद्ध प्रसंग, तेथील भारतीयांची झालेली ससेहोलपट आणि त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न याचा थरार चित्रपटातून अनुभवता येणार आहे.

दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून भुषण कुमार, कृष्णा कुमार आणि निखिल अडवाणी यांचे निर्मिती सहाय्य लाभले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवस आधी म्हणजे २२ जानेवारी रोजी एअरलिफ्ट चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 4:43 pm

Web Title: akshay kumar is back with another edge of the seat thriller in the teaser of airlift
Next Stories
1 ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते ‘सिंड्रेला’चा फर्स्ट लुक लॉन्च
2 ‘लाईट हाऊस’मधून मिळणार लघुपटांना मिळणार दर्जेदार व्यासपीठ
3 ‘कार्टी काळजात घुसली’ची शंभरी!
Just Now!
X