आपल्या अभिनयानच्या जोरावर लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. तो नेहमीच त्याचा चित्रपटांमुळे चर्चेत असतो. पण आता एका वेगळ्या कारणासाठी अक्षय चर्चेत आहे. त्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.

नुकताच ‘फोर्ब्स’ जगभरातील १०० श्रीमंत सेलिब्रिटींची यादी जाहिर केली आहे. या यादीमध्ये एकमेव बॉलिवूड अभिनेत्याचे नाव आहे. ते म्हणजे अक्षय कुमारचे. फोर्ब्सने जून २०१९ ते मे २०२० या काळातील जगातील सर्वात श्रीमंत अशा शंभर सेलिब्रिटींची नावे जाहिर केली आहेत.

‘फोर्ब्स’ने जाहिर केलेल्या यादीमध्ये अक्षय कुमार ५२व्या स्थानावर आहे. तसेच त्याची वर्षाची कमाई ४८.५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३६६ कोटी रुपये आहे. या यादीमध्ये स्थान पटकावणारा अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड अभिनेता आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०१९मध्ये देखील अक्षयने या यादीमध्ये स्थान मिळवले होते. पण तेव्हा त्याची कमाई ६५ मिलियन डॉलर (सुमारे ४४४ कोटी रुपये) होती. यंदा अक्षयच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Sometimes it’s best to sit it out #ThisTooShallPass

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

या यादीमध्ये मॉडेल कायली जेनर पहिल्या स्थानावर आहे. तिची कमाई ५९० मिलियन डॉलर (जवळपास ४४५ कोटी रुपये) इतकी आहे. त्यानंतर कान्ये वेस्ट, रॉजर फेडरर, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेबरॉन जेम्स, ड्वेन जॉन्सन यांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. या यादीमध्ये बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासचा देखील समावेश आहे.