22 October 2020

News Flash

Video : अक्षय कुमारने उडवली अमिताभ बच्चन यांची खिल्ली

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

सध्याचा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणून सोनी वाहिनीवरील ‘द कपिल शर्मा शो’ कडे पाहिले जाते. या कपिल शर्माच्या शोमध्ये अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘गुड न्यूज’चे प्रमोशन करण्यासाठी पोहोचला होता. दरम्यान अभिनेत्री करिना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ हे कलाकार देखील तेथे उपस्थित होते. हा एपिसोड लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार केवळ कपिल शर्माच्या टीमचीच नव्हे तर अमिताभ बच्चन यांची देखील खिल्ली उडवताना दिसत आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा हा व्हिडीओ विनोदवीर कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय कुमार अर्चना पूरन सिंहची खिल्ली उडवत असतो. दरम्यान त्याने अमिताभ यांच्या ‘सूर्यवंशम’ चित्रपटाची देखील खिल्ली उडवली आहे. ‘कपिल शर्माच्या संपूर्ण टीमने मिळून सोनी टीव्हीला लूटले आहे. एवढं लूटलं आहे की त्यांच्याकडे सूर्यवंशम शिवाय कोणतीच गोष्ट उरली नाही’ असे अक्षयने म्हटले आहे.

येत्या २७ डिसेंबरला अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2019 6:22 pm

Web Title: akshay kumar making fun of amitabh bachchan on kapil sharma show avb 95
Next Stories
1 #CAA: विरोधात बोलल्याने अभिनेता सुशांत सिंहची ‘सावधान इंडिया’मधून हकालपट्टी ?
2 काळीज हेलावून टाकणारी प्रेमकथा ‘इभ्रत’
3 मुँह में दही काहे जमा है रे?; ‘आर्टिकल १५’च्या दिग्दर्शकाचा सेलिब्रिटींना सवाल
Just Now!
X